वालावल येथे शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

शिवजयंतीचे औचित्य साधून युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावल यांच्या वतीने गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर येथे भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या वक्तृत्व कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवनियुक्त जि प सदस्य रुपेश पावसकर, प्रमुख पाहुणे व परीक्षकअमोल गोसावी सर, दुसऱ्या परीक्षक कु. किर्ती सांगळे मॅडम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या सौ. हळदणकर मॅडम, सौ. आडेकर मॅडम व युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावलचे अध्यक्ष करुणाकर राऊळ, स्पर्धा प्रमुख , कु. पुजा राऊळ, तसेच मंडळातील सदस्य सागर पाटकर, हेमंत वालावलकर, विशाल राऊळ, कु. वैष्णवी चव्हाण, कु. भाग्यश्री राऊळ, कु. प्रणिता वालावलकर आणि वालावल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
वयानुक्रमे तीन गटांत ही स्पर्धा पार पडली. लहान गट देवांश शिंदे (प्रथम), स्वरा वालावलकर (द्वितीय), सौम्या चौधरी (तृतीय), आर्या घाडी (उत्तेजनार्थ प्रथम), नील नेरुरकर (उत्तेजनार्थ द्वितीय). मध्यम गट: मिहिर वाडयेकर (प्रथम), अनुरा चौधरी (द्वितीय), सार्थक मुननकर (तृतीय), यश नेरुरकर (उत्तेजनार्थ प्रथम), आस्था घाडी(उत्तेजनार्थ द्वितीय). मोठा गट : केतकी हळदणकर (प्रथम), चिन्मयी नाईक (द्वितीय), अनुष्का कोचरेकर (तृतीय), अदिती कोचरेकर (उत्तेजनार्थ प्रथम), सुयश राऊळ (उत्तेजनार्थ द्वितीय).




