कुडाळ येथे १ मार्चला भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांचे आयोजन
‘ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग’ हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवावा आणि युवा वर्ग व्यायामाकडे आकर्षित व्हावा, याकरिता संस्थापक धीरज परब यांच्या स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने आठव्या वर्षी भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक दि. १ मार्च २०२६ रोजी कुडाळच्या एस एन देसाई (कॉलेज )चौक मध्ये सायंकाळी ६ वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार असून विजेत्यांसाठी हजारो रुपयांची बक्षीस ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन मान्यतेने होणार आहे.
स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) मागील सात वर्षे विविध आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या मधे सर्व प्रोफेशनल, उद्योजक, व्यवसाय,नोकरी करणारे मित्र परिवारास जोडण्याचे काम संस्थापक धीरज परब यांनी केले असुन यातून अविरतपणे सात वर्षे विविध सामाजिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या करत आहे. ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवावा आणि युवा वर्ग व्यायामाकडे आकर्षित व्हावा.. याकरिता यावर्षी म्हणजे आठव्या वर्षी संस्थेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन मान्यतेने होणार आहे. या स्पर्धेसाठी हजारो रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. महाविजेता स्वस्तिक श्री यांना रोख रु. ३० हजार, चषक आणि किताब देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याशिवाय वैयक्तीक पारितोषिकांमध्ये बेस्ट पोझर आणि मोस्ट इमप्रोव्हेड साठी प्रत्येकी रोख रु. ५ हजार पारितोषिक आहे.
स्पर्धा पाच गटांमध्ये होणार असून 0KG – 55KG ,55 KG – 60 KG,, 60KG – 65KG ,, 65KG-70kG आणि 70+KG या प्रत्येक गटामध्ये पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे रोख रुपये ३५५५/-, ३१११/- आणि २५५५/- आणि प्रत्येकाला चषक देण्यात येईल. तसेच चतुर्थ क्रमांकासाठी रोख रु. २१११/- आणि मेडल, पाचव्या क्रमांकाला रोख रु. १५१५ आणि मेडल, सहाव्या क्रमांकाला रोख रु. ११११/- आणि मेडल देण्यात येईल. मेन्स फिजिक्स स्पर्धा विजेत्यां पाच स्पर्धकांना अनुक्रमे ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार, १ हजार आणि प्रत्येकाला चषक देण्यात येईल .
कुडाळ येथील एस एन देसाई (कॉलेज )चौक येथे रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत असून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभागी व्हावे. क्रीडारसिकांनी याचा लाभ घ्यावा. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी 9422596375 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्वस्तिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.





