ज्ञानी मी होणार २०२६’ ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल जाहीर

ध्रुव सोनटक्के, अर्णव खरात, अनंत दाभोलकर, सान्वी जाधव व मेघा नाळे यांची बाजी

‘डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञानी मी होणार २०२६’ या जिल्हास्तरीय ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सामान्य ज्ञानाची चमक दाखवली.
जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या गटांत ही स्पर्धा पार पडली. यामध्ये विजेत्या ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची गटानुसार नावे खालीलप्रमाणे आहेत.
गट पहिला (इ. १ ली ते २ री) – विजेता: ध्रुव नंदकुमार सोनटक्के (पहिली) – शाळा आचरे पिरावाडी, ता. मालवण. उपविजेता – मेधांश सुनिल कोदले (दुसरी) – शाळा: साळशी नं. १, ता. देवगड.गट दुसरा (इ. ३ री ते ४ थी): विजेता – अर्णव अमोल खरात (तिसरी) – शाळा: कांदुळी, ता. कुडाळ. गट तिसरा (इ. ५ वी ते ६ वी) विजेता – अनंत संतोष दाभोलकर (पाचवी) – शाळा: सावंतवाडी नं. २. गट चौथा (इ. ७ वी ते ८ वी) विजेती – सान्वी सुरेश जाधव (सातवी) – ता. कणकवली. गट पाचवा (खुला गट) विजेती – मेघा प्रदीप नाळे – ता. वैभववाडी.
या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रु. ३३३३/-, ४३ इंची भव्य ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच एकूण स्पर्धकांच्या १०% स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके आणि सहभागी प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
“चला सिंधुदुर्गचे नाव उज्ज्वल करूया, ज्ञानाच्या या महाकुंभात सहभागी होऊया” या ब्रीदवाक्याला अनुसरून आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे ‘डॉट कॉम्स असोसिएशन’तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील इतर गुणवंत स्पर्धक – स्वराली सत्यवान लाड, सदगुरु नारायण साटेलकर, अमोल मारुती भुतल, मनीषा विनोद सरकटे, सुधीर राजाराम गावडे, कादंबरी अनिल भोसले, सहदेव दिनकर घाडीगांवकर, दीप्ती निरंजन सावंत, स्वरा दीपक बांदेकर, उर्वी संदीप पवार, रुची तानाजी सावंत, वीरा अजित कदम, वेद सहदेव घाडीगांवकर, आरुषी दत्तात्रय मांजरेकर, चैतन्य प्रेमानंद सावंत भोसले, अर्णव अमर वाघमारे, स्मृती उदय परब, वेदांत विजय साठे, वल्लरी विशाल मडव, मानस राजेश परब, वेदांत अजिंक्य पाताडे, युवराज वसंतराव पाटोळे, राशी कृष्णा करमळकर, मानस किरण सावंत, विराज लक्ष्मण लोट, हरिप्रिया उमेश कालकुंद्रीकर, संस्कृती संतोष पालव, शिवम अमोल भुतल, रुद्र लक्ष्मण पवार, रुद्र गणेश राणे, रेहांश राजाराम धुरी, डिव्हिजा विनोद चावटकर, पार्थ रामचंद्र चव्हाण, आराध्या चंद्रकांत चव्हाण, तत्पर तेजस बांदिवडेकर, शोभित प्रशांत कासले, अभिज्ञा तुषार गोसावी, सांची विलास सावंत, कनिष्क महेश आंदुर्लेकर, रियांश सिद्धार्थ कासले, केतकी समीर सामंत, आर्य हनुमंत गोसावी, जिनत जावेद शेख, नेहा नंदकुमार मुगड, सात्विक संतोष सोनमनकर, स्वानंदी सागर आईर, चिन्मय उत्तम नाळे, योगिराज प्रमोद गावडे, ओवी पंढरीनाथ सावंत, सई तानाजी सावंत, स्वयं अमोल लवले, मृणाल किरण सावंत, साहिल समीर खोत, राघव निलेश गांवकर, काव्या कृष्णा सावंत, विघ्नेश गुरुदास सावंत, गणेश प्रमोद म्हाडदळकर, श्राव्या दत्तगुरु चव्हाण, आर्यन अनिल परब, रिया धनंजय परब, पूर्णांगी प्रमोद गावडे, रीशिता राजाराम धुरी, दर्श किशोर पडते.

error: Content is protected !!