दादरेकर प्रिमियर लिगचे जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन

तुळसुली येथे श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळाचे आयोजन

श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळ आयोजित दादरेकर प्रिमियर लिग २०२६ ला तुळसुली येथे सुरुवात झाली आहे. यंदाच्या या सहाव्या पर्वाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर म्हणाले की, मी जरी नेरूरचा जिल्हा परिषद सदस्य असलो तरी कुडाळ तालुक्यातील मी प्रत्येकाचा मी मुलगा, भाऊ आहे. माझी जिथे कुठे गरज असेल तिथे मी आपल्यासाठी कायम उपस्थित असेन. तुम्ही हाक द्या आम्ही तुम्हाला साथ देऊ,असा शब्द देतो.
यावेळी तुळसुली सरपंच जयराम वारंग, सुभाष वारंग, हरीश्चंद्र वारंग, धोंडी सातार्डेकर,आबा सावंत, नाकेदार वारंग, संतोष चव्हाण, कृष्णा वारंग,कु.विनायक तुळसलकर, कु.साहील मेस्त्री, पप्पु सावंत, संदीप सावंत, अनु सावंत, संतोष वारंग, विकास वारंग, सागर वारंग, महादेव वारंग, अक्षय घाडी, भोला सावंत, प्रणित वारंग, रामचंद्र वारंग, गणेश वारंग, कीशोर सावंत, नरेंद्र सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!