खाजगी जागेत साफसफाई करण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी कुणी पाठवले?

नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांचा मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सवाल
कणकवली नगरपंचायत चे नुकसान टाळा
कणकवली नगरपंचायत मधील आरोग्य विभागातील कर्मचारी २०/०२/२०२६ कणकवली शहरातील हर्णे आळी येथे एका खाजगी मालमत्तेमध्ये कार्यालयीन वेळेत साफसफाई करताना आढळून आलेले आहेत. या संदर्भातील व्हीडीओ देखील माझे जवळ आहे. सदरचे व्हीडीओ आपणास व आपल्या विभाग प्रमुखास व्हाट्सअँप द्वारे पाठवीत आहे. अशी तक्रार नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, सदर व्हीडीओ मधील नगरपंचायत कर्मचारी हे खाजगी मालमतेमध्ये आपल्या कार्यालयाच्या परवानगीने गेले होते का? आणि एखादया व्यक्तीच्या खाजगी मालमत्तेमध्ये आपल्या आस्थापनेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेमध्ये काम करू शकतात का ? तसेच हे कर्मचारी कोणाच्या सांगण्यावरून पाठविण्यात आलेत? याचा खुलासा करावा. त्याचप्रमाणे १४ जानेवारी १७ जानेवारी २०२६ दरम्यान आपल्या नगरपंचायतचा JCB सुद्धा हर्णे आळी कणकवली हद्दीत कोणत्या कामासाठी पाठविला होता. याची देखील चौकशी करावी. तरी या संदर्भात आपण स्वतः नगरपंचायत कणकवलीचे या आस्थापनाचे एक जबाबदार अधिकारी या नात्याने या बाबतीत स्वतः लक्ष देऊन सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना योग्य ती सूचना द्यावी. जेणेकरून नगरपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होणार नाही. आणि आरोग्य विभागाच्या कणकवली शहरातील इतरही महत्वाची कामे पूर्ण होण्यास कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासणार नाही. असे या निवेदनात म्हटले आहे.





