आ . ह .साळुंखे 4 मार्च रोजी कणकवलीत
कणकवली : इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. आ. ह . साळुंखे यांचे कणकवली नगर वाचन सभागृह येथे 4 मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
अखंड मंच चे नामानंद मोडक यांनी ही माहिती दिली. अखंड व्याख्यान माले अंतर्गत या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड समाज रचनेच्या निर्मितीसाठी लोकशाही निष्ठ मूल्यांचे संवर्धन व्हावे आणि समाजाभिमुख विचारधारा जोपासावी यासाठी अखंड मंच कार्यरत आहे या व्याख्यानाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नामानंद मोडक यांनी केले आहे.
कणकवली / सीतराज परब / कोकण नाऊ