आर्थिक देवाणघेवाणीतून कुडाळ व कलमठ मधील तरुण कणकवलीत भर चौकात भिडले

एकाच पक्षातील दोन्ही गट असल्याने विषयावर पडदा

कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात भार दुपारी फ्री स्टाईल राडा

एकाच पक्षातील दोन तालुक्यांमधील युवकांमध्ये झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीचा वाद आज कणकवलीत उफाळून आला. कणकवली राजकीय नाका बनलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कुडाळ मधील काही तरुणांचा एक गट व कणकवलीतील कलमठ गावडेवाडी मधील तरुणांच्या एका गटाची चर्चा सुरू असताना शाब्दिक बाचाबाची होत येथे जोरदार फ्रीस्टाइल राडा झाला. त्याच पक्षातील कुडाळ मधील एका नेत्याच्या निकटवर्तीय व कणकवलीतील त्याच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी यात मध्यस्थी करत या विषयावर पडदा टाकला. मात्र तोपर्यंत या हा फ्रीस्टाइल राडा पाहण्यासाठी शिवाजी महाराज चौकात अनेकांनी गर्दी केली होती. काहीनी तर याचे व्हिडिओ शूटिंग देखील करून घेतले असे समजते. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुडाळ तालुक्यातील एक जण कणकवली कलमठ गावडेवाडी मधील एकाचे एक लाख रुपये देणे होता. पैकी यातील काही रक्कम देऊन झाल्यावर उर्वरित रक्कम मिळत नसल्याने कलमठ मधील त्या तरुणाने तगादा लावला होता. हे सुरू असतानाच कणकवलीत येऊन दाखवा असे आव्हान त्यांना दिले होते असे समजते. दरम्यान त्यानंतर कुडाळ मधील ते तरुण एकत्र होऊन आज शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर शाब्दिक चकमक होत भर दुपारी फ्रीस्टाइल राडा झाला. मात्र एकाच पक्षांमधील सर्वजण यामध्ये असल्याने आपसात याबाबत तडजोड करण्याकरता या चौकातून आवरते घेत घेत अन्य ठिकाणी जाऊन प्रकरण मिटवण्यात आले. मात्र याची चर्चा कणकवलीत जोरदारसुरू होती.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!