माध्यमिक शालांत परीक्षेत जनता विद्यामंदिर त्रिंबक चा शंभर टक्के निकाल

जनता विद्यामंदिर त्रिंबक शाळेचा सलग पाचव्या वर्षी 100टक्के निकाल लागला असून एकूण 31 विद्यार्थी प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी कुमारी स्वराली एकनाथ गायकवाड ही 91.40टक्के गुण मिळवून प्रथम, प्रथमेश राजेंद्र पुजारे 89.60टक्के गुण मिळवून द्वितीय, हर्ष प्रवीण घाडीगावकर 86.80 टक्के गुण मिळून तृतीय, आर्यन उमेश घाडीगावकर84 टक्के गुण मिळवून चतुर्थ, तर हार्दिक आनंद परब 83.40 टक गुण मिळवून पाचवा आला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, तसेच उपाध्यक्ष अशोक बागवे, कार्यवाह श्री अरुण घाडी त्याचप्रमाणे सर्व माध्यमिक शिक्षक कार्यकारीणी तसेच मुख्याध्यापक श्री प्रवीण घाडीगावकर व सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.