जिल्हास्तरीय बाल नाट्य स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नाटिकेस उत्कृष्ट तांत्रिक अंगाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक

पोईप : कांदळवन प्रतिष्ठान, इकोफोक्स व्हेंचर्स आणि स्वराध्या फाउंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ /२ /२०२३ रोजी मामा वरेरकर नाट्यगृहामध्ये आयोजित बालनाट्य स्पर्धेमध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाल नाटिकेस उत्कृष्ट तांत्रिक अंगाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यथा कांदळवनाची गरज संवर्धनाची ….हे बालनाट्य सादर केले.
या बालनाट्यासाठी
लेखन व नेपथ्य: समीर चांदरकर दिग्दर्शन: संजय नाईक
व्यवस्थापक :भूषण गावडे
निर्मिती सहाय्य:
महेश भाट, प्रकाश कानूरकर, संजय पेंडुरकर,
विशेष सहाय्य :ओमप्रकाश आचरेकर आचरा
प्रेरणा व मार्गदर्शन :अजयराज वराडकर ,अध्यक्ष कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा व सर्व सन्माननीय संचालक
बालकलाकार
सुरेश: संकल्प पेंडुरकर
पर्यटक: ओम महाडगुत कांदळवन: ध्रुवी भाट
खेकडा: कृतिका लोहार
मासा :हर्षिता कानूरकर
परश्या: अमृत गावडे
वनपाल: ओंकार रोहिलकर
या बालनाट्य मध्ये भाग घेतलेल्या सर्व बालकलाकारांचे मार्गदर्शक शिक्षकांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा च्या वतीने तसेच माजी विद्यार्थी संघ वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा च्या वतीने तसेच हार्दिक अभिनंदन.
बक्षीस वितरण कार्यक्रम सिने कलाकार अभय खडपकर, नितीन वाळके, पंडीत मॅडम तसेच स्वराध्या फाउंडेशन, कांदळवन प्रतिष्ठान इकोफॉक्स व्हेंचर्स यांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
अशा प्रकारच्या बालनाट्य स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. विद्यार्थ्यांना व आंम्हा शिक्षकांना यातून बरेच अनुभव घेता आले.
याचा फायदा भविष्यामध्ये निश्चितच होईल.
संतोष हिवाळेकर / कोकण नाऊ / पोईप