खोटले येथे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

साई स्पोर्ट कट्टा संघ प्रथम तर सान्वी स्पोर्ट खोटले संघ द्वितीय पारितोषिकाचा मानकरी
पोईप : मालवण तालुक्यातील श्री. देव महापुरुष क्रिकेट क्लब खोटलेच्या वतीने आणि उद्योजक आशिष परब,खोटले सरपंच सुशील परब यांच्या सहकार्यातून खोटले येथे ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत साई स्पोर्ट कट्टा संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, तर सान्वी स्पोर्ट खोटले संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.या दोन्ही संघांना कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते चषक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उद्योजक आशिष परब,खोटले सरपंच सुशील परब,पोईप विभागप्रमुख विजय पालव, महिला विभाग प्रमुख आरती नाईक, उपविभागप्रमुख निलेश पुजारे, शाखा प्रमुख महेश घाडी यांसह श्री. देव महापुरुष क्रिकेट क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
संतोष हिवाळेकर / कोकण नाऊ / पोईप