श्री शिवकृपा कला क्रीडा मंडळ म्हापण चव्हाणवाडी आयोजित “शिवचषक २०२३ सिंधुदुर्ग प्रीमियर लीग”चा मानकरी ठरला जय भवानी कुडाळ संघ, श्री विठ्ठल स्पोर्ट कुडाळ उपविजेता..

म्हापण : माजी सभापती तथा भाजपा सरचिटणीस निलेश सामंत परुळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचीन देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व सेवा निवृत्त वनअधिकारी नामदेव चव्हाण यांच्या आर्थिक पाठबळामुळे स्पर्धेचे यशस्वी आयोजन..
दि. 24 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत म्हापण चव्हाणवाडी येथे श्री शिवकृपा कला क्रीडा मंडळ म्हापण चव्हाणवाडी आयोजित शिवचषक 2023 सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग या क्रिकेट स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला. शिवचषक 2023 चा मानकरी ठरला ‘जय भवानी कुडाळ’ संघ तर ‘श्री विठ्ठल स्पोर्ट कुडाळ’ संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. ‘आई भवानी मालवण’ संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला व ‘देवाक काळजी चेंदवन’ संघाला चतुर्थ क्रमांक प्राप्त झाला.
या स्पर्धेचा प्रमुख हेतू हा मंदीर उभारणी निधी संकलन हा होता. त्यामूळे सर्वांनी या स्पर्धेला सर्वच बाबतीत भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेला माजी सभापती तथा भाजपा सरचिटणीस श्री निलेश सामंत परुळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री सचीन देसाई परुळे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी व सेवा निवृत्त वनअधिकारी श्री नामदेव चव्हाण म्हापण या दातृत्ववान व्यक्तींचे मोलाचे व मोठे आर्थिक पाठबळ लाभले. इतरही अनेक व्यक्तींनी मंडळाला सढळ हस्ते देणगी स्वरूपात सहकार्य केले. या सर्व दात्यांमुळे स्पर्धेचे आयोजन यशस्वी पार पडले. मंडळाच्या वतीने सर्व दात्यांचे, स्पर्धेत सहभागी संघमालकांचे, खेळाडूंचे आभार व्यक्त करण्यात आले.
स्पर्धेदरम्यान बॉक्स टाईप क्रिकेट मधील दिग्गज खेळाडू अण्णा कदम कुडाळ, संतोष पडोसकर कोचरा व मिलिंद पाटकर पाट यांचा बॉक्स क्रिकेटच्या योगदानासाठी आणि त्यांच्या दैदीप्यमान कारकीर्दीसाठी गौरव करण्यात आला.
या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून जय भवानी कुडाळ संघाचा अष्टपैलू खेळाडू सोहेल शेख यांची निवड करण्यात आली. उत्कृष्ट गोलंदाज श्री विठ्ठल स्पोर्ट कुडाळ संघाचा कर्णधार मिलिंद पाटकर तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून आई भवानी मालवण संघाचा गुणेश हडकर याची निवड करण्यात आली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दिक्षिता स्पोर्ट म्हापण संघाचा आयकॉन खेळाडू योगेश मेस्त्री तर आदर्श खेळाडू म्हणून सिद्धी सेवन कुडाळ संघाचा गुणवाण खेळाडू राहुल काळप याला निवडण्यात आले. आदर्श संघ हा मानाचा किताब माऊली स्पोर्ट माड्याचीवाडी संघाला देऊन सन्मानित करण्यात आले.
समालोचक म्हणून निखिल पाटकर, ऋषिकेश घाडी, राकेश शिंदे, रुपेश मुणनकर व अनिकेत सावंत यांनी काम पाहिले. पंच म्हणून मंथन पाटकर, संतोष पडोसकर, चंदन माडये, उमेश मडवळ, रोहिदास म्हापणकर, संकेत परब, देवेन माधव, अजय नार्वेकर, अर्जुन चव्हाण, हर्षद चव्हाण, पिंट्या तळावडेकर, प्रफुल्ल पाटकर, योगेश परूळेकर, राहुल कळप, गोट्या कांबळी यांनी चोख कामगिरी बजावली.
या स्पर्धेला हस्ते परस्ते सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
समीर चव्हाण / कोकण नाऊ / म्हापण