…..मुलीच्या लग्नातील आहेराची सर्व रक्कम मंदिराला दान

खारेपाटण मधील अनंत चव्हाण यांचा अनुकरणीय उपक्रम

खारेपाटण येथील रहिवासी अनंत भिकाजी चव्हाण यांनी श्रध्देने व सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलीच्या लग्नात आलेली आहेराची सर्व रक्कम ही आदिष्ठी मंदिराला दान केली.
खारेपाटण येथील नाभिक बंधू अनंत भिकाजी चव्हाण हे पिढीजात असलेला नाभिक व्यवसाय चालवत आहेत.त्यांनी याआधी सुद्धा आपल्या दोन्ही मुलींच्या लग्नात आलेल्या आहेराची सर्व रक्कम ही खारेपाटण येथील दोन मंदिरांना अर्पण केली होती.आता तिसऱ्या मुलीच्या लग्नात आलेली आहेराची सर्व रक्कम सुद्धा त्यांनी मंदिराला अर्पण केली.त्याच्या या अनुकरणीय उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याबाबत बोलताना श्री चव्हाण सांगतात, माझ्या तिन्ही मुलीच्या लग्नाचा जो आहेर येईल तो मी श्रध्देने मंदिर सेवेसाठी अर्पण करेन असा माझा कायम मानस होता त्यानुसार मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या आहेराची रक्कम ही मंदिरांना अर्पण केली आहे.तसेच त्यांनी याआधी सुद्दा श्रध्देपोटी मंदिरांना देणगी स्वरुपात मदत केल्याचे ते सांगतात आणि भविष्यात ही असेच सामाजिक कार्य करीत राहणार असल्याचे त्यांनी व्यक्त केले.मंदिराच्या ट्रस्टी कडून अनंत चव्हाण यांचे आभार मानण्यात आले. यावेळी अनिल कुलकर्णी, शांताराम घाडी,गोपीनाथ मेस्त्री, ओमकार चव्हाण आदी उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे,खारेपाटण

error: Content is protected !!