सिंधुगर्जना चषक २०२४ चा मानकरी ठरला रामेश्वर सुपरस्ट्रायकर्स संघ
उपविजेता गुरुकृपा ग्लेडिएटर्स संघ
एन बी एस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित सिंधुगर्जना चषक २०२४ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कणकवली येथे करण्यात आले होते या स्पर्धेत सहा संघानी सहभाग घेतला होता. कृष्णराज सातवसे यांच्या रामेश्वर सुपरस्ट्रायकर्स संघाने नेहा भोसले हिच्या नेतृत्वाखाली सिंधुगर्जना चषक २०२४ वर आपले नाव कोरले तर शुभम पवार यांचा गुरुकृपा ग्लेडिएटर्स संघ मिनल साबळे हिच्या नेतृत्वाखाली उपविजेता ठरला
ही क्रिकेट स्पर्धा ब्राह्मणदेव मंदिर कनकनगर येथील मैदानात झाली. या स्पर्धेत सर्व खेळाडू हे सिंधुगर्जना पथकातील वादक होते. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक संघाच्या संघनायक या मुली होत्या. कणकस्टार संघमालक कल्पेश महाडेश्वर, अनुरी वॉरियर्स संघमालक अनुजा ऋषिकेश भिसे, स्वयंभू रवळनाथ स्पोर्ट्स संघमालक जोगेश राणे, गुरुकृपा ग्लेडिएटर्स संघमालक शुभम पवार, D.S. स्वराज संघमालक सुमंगल सावंत, रामेश्वर सुपरस्ट्रायकर्स संघमालक कृष्णराज सातवसे यांचे संघ होते. आयपीएल प्रमाणेच लिलाव प्रक्रियेने सर्व पथकातील खेळाडूंची निवड या संघांमध्ये करण्यात आली. मान्यवरांच्या शुभहस्ते सकाळी या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
या स्पर्धेत १० सामने खेळविण्यात आले सिंधुगर्जना चषक २०२४ चा अंतिम सामना रामेश्वर सुपरस्ट्रायकर्स विरुद्ध गुरुकृपा ग्लेडिएटर्स या संघांमध्ये रंगला. १० रंगतदार सामन्यातून रामेश्वर सुपरस्ट्रायकर्स संघ सरस ठरला. अक्षय मांडवकर याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. तर मुलांमध्ये उत्कृष्ट फलंदाज रोशन परब व उत्कृष्ट गोलंदाज आदित्य घाडीगावकर ठरला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ऋषिकेश परब याला गौरविण्यात आले. मुलींमध्ये उत्कृष्ट फलंदाज साक्षी येंडे, उत्कृष्ट गोलंदाज नेहा भोसले यांना गौरविण्यात आले. सिंधुगर्जना चषक २०२४ क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी गटविकास अधिकारी तथा सेन्सॉर बोर्ड सदस्य मा.विजय चव्हाण, ऍड.प्राजक्ता शिंदे. कणकवली पोलीस अधिकारी मा.किरण मेहते, कणकवली अर्बन निधी बँक संचालक प्रीतम पारकर हे उपस्थित होते.सर्व वादकांचे त्यांच्या कार्याबद्दल व हे पथक फक्त सिंधुदुर्ग जिल्हा पुरते मर्यादित न राहता इतर राज्यात देखील सिंधुगर्जना पथकाने नावलौकिक कमावला आहे. गेली पाच वर्षे वाद्यवादनातून आपली कला जोपासली आहे तरुण पिढीचा हा उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे त्याबद्दल मान्यवरांनी सर्व वादकांचे विशेष कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिंधुगर्जना पथकाच्या अध्यक्षा सुरेखा भिसे प्रा.हरीभाऊ भिसे, कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, अनुजा ऋषिकेश भिसे, ज्येष्ठ पत्रकार श्री. अशोक करंबेळकर,श्री.गणेश काटकर,विजय शिंदे,संघमालक कृष्णराज सातवसे,जयवंत सातवसे, कल्पेश महाडेश्वर, सुमंगल सावंत, जोगेश राणे, खजिनदार शुभम पवार, पथक प्रमुख नितीन चव्हाण, उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे, महिला प्रमुख रिदा मन्सुरी, उपप्रमुख मिनल साबळे, व पथकातील सर्व पदाधिकारी आणि वादक उपस्थित होते. या स्पर्धेचे पंच म्हणून रोहित म्हापसेकर,वैभव म्हापसेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
कणकवली, प्रतिनिधी