नेरुर येथे १२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेसह आता अनेक संस्थांचे आयोजन
नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग
प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून रविवार १२ मे २०२४ रोजी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग संचलित कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरूर ( जुने नेरुर इंगेट्रॉऊट(इंगेश) हॉस्पिटल) येथे मोफत आरोग्य निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचालित कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर, कॉलेज ऑफ नर्सिंग आणि कॉलेज ऑफ फिझीओथेरपी, कुडाळ तालुका पत्रकार समिती, बॅ .नाथ पै फॉउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, शासकीय वेद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग, प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल आणि लेट मिसेस इंगेट्राऊट नाईक विद्या प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरामध्ये हृदयरोग उपचार, लहान मुलांचे आजार, डोळ्यांचे आजार याबरोबरच रक्तदाब तपासणी, इसीजी काढणे, अस्थिव्यंग व हाडांची तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, कर्करोग तपासणी यांच्या सहित अस्थिरोग स्नायू संबंधित विकार व वेदना संधिवात, सांधेदुखी, टेनिस एलबो, हाता पायाला मुंग्या येणे, मणक्यामध्ये गॅप- फ्रॅक्चर व अपघातानंतरचे दुखणे, शिरा व स्नायू आखडणे, कंबर- पाठ व मानेचे दुखणे, स्पॉंडिलायसिस व सायटिका या रोगाबरोबरच मेंदूचा विकार, मेंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतर चेहऱ्याचा पॅरालिसिस, अर्धांग वायू, लकवा, जन्मता किंवा अपघातामुळे आलेले अपंगत्व, क्रीडा इजा प्रतिबंध, आणि पुनर्वसन तसेच हृदय आणि फुफ्फुसाचे विकार, कर्करोग तपासणी , असंसर्गजन्य आजार ,मोफत रक्त तपासणी व सर्व आजारावरची तपासणी व सल्ला इत्यादीवर सुद्धा निदान व उपचार केले जाणार आहेत.
वरील सर्व संस्थांच्या पुढाकाराने आयोजित केल्या गेलेल्या या आरोग्य शिबिरामध्ये सकाळी १०ते दुपारी 2 वाजेपर्यंत सिंधुदुर्गातील नामांकित डॉ. संजय निगुडकर, डॉ संजीव आकेरकर, डॉ योगेश नवांगुळ, डॉ. संदेश कांबळे (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. आदेश पालयेकर, डॉ. गायत्री पालयेकर, डॉ शंतनु पालकर (सिद्धगिरी हॉस्पिटल कोल्हापूर), डॉ गौरव घुर्ये, डॉ. चरमचेरला हेमचंद, डॉ योगिता राणे, डॉ. सेधु राजा, डॉ प्रगती शेटकर डॉ प्रत्तुष रंजन, डॉ रोहन भांगरे, डॉ एन एस माकर, श्री सौरभ बालम, श्री चेतन कोरे, डॉ प्रगती शेटकर, डॉ .रोहन भांगरे, डॉ पी. ज्योतीरंजन , डॉ बी.प्रत्युषरंजन , डॉ .शरावती शेट्टी, असे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन व उपचार करणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रा. वैशाली ओटवणेकर- 9881886606, डॉ. शरावती शेट्टी-7208171190, डॉ रोहन भांगरे-7208302477, शंकर माधव 92 84 50 83 73 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तरी इच्छुक रुग्णांनी नेरूर येथील कै. यशवंतराव नाईक रुग्णालय व संशोधन केंद्र नेरूर अर्थात जुने इंगेश हॉस्पिटल येथे नियोजित वेळेत उपस्थित राहून या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. सदर शिबिराधे कोणत्याही प्रकारचे आजार आढळून आल्यास संबंधित रुग्णांना पुढील मोफत उपचारा संदर्भात विशेष सल्ला दिला जाईल, तसेच याच ठिकाणी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड, आभा कार्ड नोंदणी सुद्धा केली जाणार आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.