राणे समर्थकांच्या मारहाणीत जखमी झालेले बाळा राऊत यांची खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली विचारपूस

ओरोस शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये दिली भेट ; मारहाणीचा केला निषेध

         लोकसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारी मतदान संपल्यावर सायं. ६.२० सुमारास कणकवली खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी सरपंच बाळा राऊत यांना  राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात ते जखमी झाल्याने त्यांना तातडीने खारेपाटण प्रा. आ. केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने त्यांना ओरोस येथील शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करण्यात आले आहे. आज खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी बाळा राऊत यांची भेट घेऊन  विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच बाळा राऊत यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला. राणे समर्थकांची  हीच दहशत संपविण्यासाठी शिवसेना लढा देत आहे.त्यासाठी जनतेची साथ महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
        यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,हरकूळ सरपंच बंडू ठाकूर,सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!