चिंचवली येथील ८० वय असणाऱ्या जनार्दन धोंडू पेडणेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. कडाक्याचे ऊन असूनही नागरिकानी उत्साहाने मतदान केले. चिंचवली येथील ८० वय असणाऱ्या जनार्दन धोंडू पेडणेकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.जिल्हा प्राथमिक शाळा चिंचवली मधली वाडी मतदान केंद्र क्रमांक २०१ या मतदान केंद्रावर जाऊन आजोबांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





