निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या घटनेने उलट – सुलट चर्चा

कारण गुलदस्त्यात, पोलिसांकडून घटनास्थळी शोध सुरू

कणकवलीत आज शनिवारी रात्री 9.30 वा. सुमारास डीपी रोडवर लावलेली ओमनी कारची काच अज्ञाताने फोडल्याची घटना घडली. या घटनेबाबत डायल 112 नंबर वर फोन आल्यानंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र ही कारची काच कोणी फोडली? त्यामागील नेमके कारण काय? ही कार कुणाची होती? याशी घटनेची राजकीय संबंध आहे की अन्य हेव्या दाव्यातून ही घटना घडली यासह अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. मात्र याबाबत पोलिसांकडून देखील अधिकची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेची उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. आज कणकवलीत राज ठाकरे यांची नारायण राणेंच्या प्रचारार्थ सभा होती. या दरम्यान डीपी रोडवर ही घटना घडली. मात्र पोलीस सभास्थळी बंदोबस्तासाठी असल्याने सभा संपल्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेची अधिकची माहिती समोर आली नसली तरी ओमनी कारची साईटची काच फोडल्याने रस्त्यावर काचेचा सडा पडला होता. दुपार पासूनच ही कार येथे लावली होती असे समजते. या घटनेची अधिक माहिती कणकवली पोलीस घेत आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!