श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा या संस्थेतर्फे वाचन संस्कृती वाढीसाठी ‘कै. रामचंद्र तथा दादा ठाकूर स्मृती आजीव सदस्यत्व प्रदान योजना’
आचरा : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा या संस्थेने वाचन संस्कृती वाढीसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम सुरू असतात. या वर्षी संस्थेने ‘कै. रामचंद्र तथा दादा ठाकूर स्मृती आजीव सदस्यत्व प्रदान योजना’ राबविली आहे. दहावी शालांत परीक्षेत मराठी विषयात जास्तीत जास्त गुण संपादन केलेल्या आचरे गावातील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत दरवर्षी आचरा कनिष्ठ महाविद्यालयामधून अकरावी कला व वाणिज्य शाखेतील दहावी शालांत परीक्षेत मराठी विषयात जास्त गुण मिळविलेल्या आचरा गावातील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना सोमवार २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराचे आजीव सदस्यत्व बहाल करण्यात येणार आहे. या योजनेचे हे चौथे वर्ष आहे.
या योजनेत सानिया मळगी, संजना पवार, वैष्णवी घाडी, नियती पेडणेकर, भूमिका आचरेकर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. युवा पिढीने वाचन मंदिराचा सातत्याने लाभ घेऊन आपला व्यक्तिमत्व विकास करावा, हीच यामागची प्रसाद ठाकूर आणि कुटुंबीय (आचरा पारवाडी) यांची योजना आहे, अशी माहिती अध्यक्ष श्रीकांत सांबारी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी दिली.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / आचरा