मराठीचा विसर पडू देऊ नका – डॉ. व्ही. बी. झोडगे
संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा
रसिक म्हापसेकर ठरली उत्तम वाचक
निलेश जोशी । कुडाळ : मराठी ही आपली मातृभाषा आहे.याचा विसर होऊ न देता युवापिढीने तिचे उपयोजन केले पाहिजे असे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही.बी. झोडगे यांनी केले. संत राऊळ महाराज महाविद्यालयांत आज मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. झोडगे बोलत होते. उत्तम वाचक म्हणून यावेळी कु रसिका म्हापसेकर,प्रथम वर्ष कला या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.झोडगे यांच्या शुभहस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.शरयू आसोलकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी मराठी भाषेची गतकाळाची व वर्तमान वाटचाल याबद्दल विद्यार्थ्यांना परिचय करुन दिला.अध्यक्षस्थानावरुन बोलताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्राध्यापक डॉ. झोडगे सर यांनी मराठी ही आपली मातृभाषा आहे.याचा विसर होऊ न देता युवापिढीने तिचे उपयोजन केले पाहिजे असे सांगीतले.
यावेळी डाॅ.ए.एन.लोखंडे,डाॅ.कॅप्टन एस.टी.आवटे,डाॅ.व्ही.जी. भास्कर, प्रा.जमदाडे यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी मराठी विभागातर्फे विविध प्रसंगी आयोजित केलेल्या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना मराठी विभागाच्या वतीने पुस्तकभेट देऊन गौरविण्यात आले. उत्तम वाचक म्हणून कु रसिका म्हापसेकर,प्रथम वर्ष कला या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली. विशेष लेखन कौशल्यांची वर्ष व्यवस्थापन शास्त्र या वर्गातील कु. धनश्री रामानंद मुंज हिलाही पुस्तकभेट देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरेल सुरुवात कु.मानसी भागवत हिच्या मराठी अभिमान गीतगायनाने झाली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डाॅ.शरयू आसोलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.संतोष वालावलकर यांनी केले तर कु.चेतना राठोड हीने उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थी बहसंख्येने उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.