कोकणातील 70 युवक संघटनांचा विनायक राऊत याना पाठिंबा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील सुमारे ५ हजार युवकांचा समावेश

पत्रकार परिषदेत माहिती

निलेश जोशी । कुडाळ : कोकणातल्या युवकांच्या विविध संघटना एकवटल्या असून त्यानी इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत याना पाठिंबा जाहीर केला आहे. यात रत्नागिरी सिंधुदुर्गतल्या 25 संघटनांचा समावेश आहे. अशी माहिती कोकण युवा स्वाभिमान संघटनेचे अनंतराज पाटकर यांनी दिली. कुडाळ इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी दक्ष युवक भारत संघटनेचे आदित्य बटावले, मिहीर तांबे यांनी सुद्धा यावेळी पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी बोलताना अनंतरज पाटकर म्हणाले, यापूर्वी मी भाजपच्या युवा वॉरियर्सचे काम करत होतो. पण दीड महिन्यापूर्वी त्या पदाचा राजीनामा दिला. आता आम्ही तरुण अपक्ष म्हणून काम करत आहोत. येत्या येत्या लोकसभा निवडणुकीत कोकणातील जेवढ्या युवकांच्या संघटना आहेत त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत याना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे या कोकणातील सर्व जिल्हयांतील युवा संघटनानी मिळून युवा स्वाभिमान संघटना स्थापन केली आहे. या संघटनेत सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेली तरुण मंडळी आणि संघटना आहेत. विनायक राऊत यांनाच पाठिंबा का, या प्रशांवर पाटकर म्हणले कि गेल्या दहा वर्षात विनायक राऊत यांची कामगिरी, सर्वसामान्य माणसातील खासदार म्हणून असलेली लोकप्रियता, त्यांनी आपल्या कामाचा उमटविलेला ठसा त्यामुळे प्रेरित होऊन आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. कोकणात पाच जिल्ह्यात मिळून ७० संघटना असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील २५ संघटनांनी विनायक राऊत याना पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांचे मिळून साडेचार हजार ते पाच हजार तरुण सदस्य असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना दक्ष युवक भारत संघटनेचे सचिव आदित्य बटावले म्हणाले, आज युवकांसमोर रोजगार हा प्रश्न आहे. खासदार विनायक राऊत हा प्रश्न नक्की सोडवू शकतील, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत असल्याचे श्री. बटावले म्हणाले.
मिहीर तांबे म्हणाले, भाजपचा २०१४ मध्ये स्लोगन होता अबकी बार मेहंगाई पर वार. पण आज तसे आहे का ? आज महागाई खूप वाढली आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीला पर्यायाने विनायक राऊत यांना पाठिंबा देत आहोत. आजचे युवक स्पर्धा परीक्षा देतात पण त्यातही घोटाळे होतात. पेपरफुटीसारखे प्रकार घडतात. परीक्षा रद्द होतात, त्यामुळे मुलांची मेहनत वाया जाते. फक्त शिकावे आणि शिकून बेरोजगार व्हावे अशी आजची स्थिती आहे. खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हा पण देशातील मोठा प्रश्न आहे. संविधानाची थट्टा चालली आहे. हि थट्टा आम्हा युवकांना थांबवायची आहे, त्यासाठी आम्ही इंडिया आघाडीला समर्थन देत आहोत. असे श्री. तांबे म्हणाले.
यावेळी अनंतराज पाटकर मिली मिश्रा आदित्य बटवले मिहीर तांबे सागर कुंभार अनिरुद्ध ढवळे प्रतीक थोरवे ओंकार काळे सुहास ढवळे विकास देशमुख उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!