तळेरे विभागात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार सुरु

प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरले असून प्राचाराचे वादळ हे वेगाने घोंगावताना आपल्याला पाहायला मिळते आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी तळेरे विभागात देखील सुरुवात झाली असून,यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना मतदारांकडे मशाल निशाणी पोचवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व आघाडीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.
तळेरे विभागात प्रचारा वेळी शाखा प्रमुख -योगेश मुद्राळे,युवासेना शहरप्रमुख-आदित्य महाडीक,पवी वरूनकर,अस्मीता तळेकर,तात्या पिसे आशिष पिसे याच्यासह शिवसेने चे(उध्दव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचाराच्या रिंगणात उतरून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करीत आहेत.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण