प्रा. डॉ.व्ही.बी.झोडगे, प्रा.एच.आर.यादव, अधीक्षक पी.एम. सावंत यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार

संत राऊळ महाराज महाविद्यलयाच्या सेवेतून निवृत्त
प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रोफेसर डॉ.व्ही.बी.झोडगे, तसेच प्रा.एच.आर.यादव आणि कार्यालयीन अधीक्षक पी.एम. सावंत हे नियत वयोमानानुनसार सेवानिवृत्त झले. त्यानिमित्ताने त्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.एन.लोखंडे हे या समारंभाच्या अध्यक्ष,स्थानी होते. यावेळी क.म.शि.प्र.मंडळाचे सरकार्यवाह आनंद वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या वतीने सर्वप्रथम प्रोफेसर डॉ.व्ही.बी.झोडगे यांचा शाल, श्रीफळ, महाविद्यालयाचे स्मृतिचिन्ह, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन, संस्था पदाधिकारी आनंद वैद्य व प्र.प्राचार्य डॉ.ए.एन.लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच सौ.सुधा झोडगे यांचाही प्रा.प्रज्ञा सावंत यांनी सौभाग्यलेणे देऊन सन्मान केला. महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्रमुख पद सांभाळलेले,दोन वेळा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी कार्यरत असलेले डॉ.व्ही.बी.झोडगे यांनी सत्कार स्वीकारून आपले मनोगत व्यक्त केले.
सेवेत रूजू होतानाचे सुरुवातीचे दिवस कसे होते हे कथन करत,निवृत्त होईपर्यंत संस्थेने,महाविद्यालयाने तसेच प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनानी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपला शैक्षणिक तसेच प्रोफेसर या पदापर्यंतचा प्रवास त्यांनी यावेळी सांगितला.क.म.शि.प्र.मंडळाचे सरकार्यवाह आनंद वैद्य यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी पाश्चात्त्य देशांमध्ये प्राध्यापकांची निवृत्ती कधीच होत नाही याकडे लक्ष वेधले तसेच या तीनही सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या.
प्रा.एच.आर.यादव व कार्यालयीन अधीक्षक श्री.पी.एम.सावंत यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, महाविद्यालयाचे स्मृतिचिन्ह, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन प्र.प्राचार्य डॉ.ए.एन.लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच सौ.नयना यादव आणि सौ.प्रणिता सावंत यांचाही प्रा.सुवर्णा निकम यांनी सौभाग्यलेणे देऊन सन्मान केला.
भूगोल विभाग प्रमुख प्रा.एच.आर.यादव यांनीही सत्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयामध्ये सेवेत आपण कसे रुजू झालो तसेच आपले सहकारी, संस्था ,महाविद्यालय, विद्यार्थी यांच्या आठवणी सांगितल्या.कार्यालयीन अधीक्षक पी.एम.सावंत यांनी आपले हृद्य मनोगत व्यक्त केले. सुरुवातीपासूनच्या सर्व प्राचार्य ,प्राध्यापक, तसेच वरिष्ठ अधिकारी, कार्यालयीन अधीक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण कसे घडत गेलो हे सांगून शेवटच्या सेवेच्या कालावधीमध्ये आपले आजारपण कसे वाढत गेले व तब्येत हळूहळू कशी सुधारत गेली हे सांगताना आपला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयुष्यात कधीच येणार नव्हता तो तुम्हा सर्वांच्या सदिच्छामुळे आज आला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या वतीने तसेच य.च.म.मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र कुडाळच्या वतीने , तसेच महाविद्यालयाच्या बुक्टू युनिटच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार कसरण्यात आला. तसेच रसायनशास्त्र विभाग,बांदा पानवळ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.एस.बी.सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.व्ही.जी.भास्कर,प्रा.डॉ.एस.के.पवार,प्रा.डॉ.शरयू असोलकर,प्रा.डॉ.एस.टी.आवटे,प्रा. डॉ.पी.डी.जमदाडे,मुख्यलिपिक श्री.संगम कदम,श्री.प्रदीप सावंत यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.प्रा.संतोष वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.सत्कार समारंभास महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच तीनही सत्कारमूर्तीचा परिवार,स्नेही ,नातेवाईक,पु.ला.कदम आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





