एसआरएम कॉलेज मध्ये निःशुल्क सॅप (SAP) प्रशिक्षण

उत्कर्ष फाउंडेशनचे सहकार्य

पत्रकार परिषदेत माहिती

निलेश जोशी । कुडाळ : कामशिप्र मंडळ संचलित कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये उत्कर्ष फांऊडेशनच्या सहकार्याने बी कॉमच्या विद्यार्थ्यांसासाठी आर्थिक प्रशिक्षण म्हणजेच सॅप अभ्यासक्रमाची सुरुवात झाली आहे. सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये शुल्क असणारे हे प्रशिक्षण निवडक अशा १२ विद्यार्थ्यांना अगदी निःशुल्क मिळणार आहे. १ मे ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच बरोबर आयटीच्या विद्यार्थ्यांसासाठी सुद्धा वेगळे प्रशिक्षण आयोजित केले आहे. अशी माहिती आज संत राऊळ महाराज महाविद्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. प्रशांत केरवडेकर, संस्थेचे सर कार्यवाह अनंत वैद्य आणि उत्कर्ष फाउंडेशनचे दिलेन्द्र शिरधनकर यांनी दिली.
यावेळी कामशिप्र मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, माजी उपकार्याध्यक्ष भाई तळेकर, सीईओ सुरेश चव्हाण, खजिनदार प्रदीप आंगचेकर, सह कार्यवाह महेंद्र गवस, प्राचार्य डॉ. अनंत लोखंडे उपस्थित होते.
दि. 1 मे ते 31 जुलै याकालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत संगणकावर आधारित एसएपी (SAP) हा आर्थिक प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा कालावधीत तीन महिन्याचा आहे. विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये तसेच बाहेरील राज्यात या प्रशिक्षणासाठी शुल्क भरून जावे लागते. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मार्केटमध्ये साडेचार लाख रुपये शुल्क दयावे लागेते. परंतु याठिकाणी हे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे.
श्री. शिरधनकर म्हणाले, उत्कर्ष फाऊंडेशच्या वतीने दोन वर्षापूर्वी नवीनच कामाला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आज अशा संधी मिळत नाहीत. ग्रामीण विद्यार्थ्यांना आयटीमधून प्रशिक्षण देऊन त्यांचे कुठेतरी चांगले करीयर व्हावे, यासाठी हे प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणासाठी बाहेर तीन लाख रुपये शुल्क आहे. परंतू याठिकाणी हे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. एसएपी हे खूप महत्वाचे प्रॉडक्ट आहे. जगातील 98 ते 99 कंपन्यात एसएपी वापरले जात आहे. एसएपी हे कमर्शियल सॉफ्टवेअर आहे. कुडाळ मधील विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे. कुठल्याही गावातील विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
प्रा. केरवडेकर म्हणाले, एसएपी ही कॉम्पुटर मधील अग्रगण्य टेक्नॉलॉजी आहे. याचा वापर मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमसाठी केला जातो. यामध्ये वेगवेगळे विभाग येतात. त्यातील दोन विभाग येथील संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये सुरु करण्यात आले आहेत. यातील पहिला विभाग बायनान्स कॅटॅगरीमध्ये येतो. हा विभाग कॉमर्स पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच त्यातीलच आयटी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी हा विभाग 11 मे पासून सुरु होत आहे.
प्रशिक्षणसाठी सुमारे 140 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील 12 विद्यार्थ्यांची एक बॅच बनविली आहे. ही बॅच कोर्पोरेट पद्धतीने भरण्यात आली. तसेच काही दिवसात विद्यार्थ्यांसाठी मार्केटीग प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण बाहेरील कंपन्या ऑनलाईन पद्धतीने देणार आहेत. तसेच उत्कर्ष फाऊंडेशन मार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले.
तसेच बजाज लिमिटेड पुणे यांच्यामार्फत देण्यात आलेल्या बँकिंग, इन्शुरन्स, फायन्स या तीन डिव्हीजनमध्ये या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेश पूर्ण केले आहे. याचा 53 विद्यार्थ्यांनी फायदा घेतला होता. याठिकाणी आयटी सेक्टरही सुरु करण्यात आले आहे. इथून पुढे सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना इंटरशिप ही परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. असे त्यांनी सांगितले.
आनंद वैद्य म्हणाले, आपल्याकडील विद्यार्थी फक्त डिग्री घेतात. परंतु त्या क्षेत्रात ते जात नाहीत. आज नवीन अभ्यासक्रमात स्किल बेसीक महत्वाचे आहे. पूर्वीचे पदवीचे शिक्षण आणि आताचे पदवी शिक्षण खूप वेगळे आहे.कुडाळमधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!