खास मुलांसाठी नऊ दिवसांचे आगळे वेगळे शिबिर

विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल चे आयोजन
लहान मुलांची बुद्धी म्हणजे कल्पनांचे बीज पेरण्याची सुपीक जमीन. मुलांच्या जिज्ञासा, चौकसता, कौशल्य, कल्पकता या गुणांना वाव मिळावा, पुस्तकी ज्ञानाबरोबरच आकलनता, निरीक्षण ,व्यवहारिकता यांचे ज्ञान मिळावे, त्यांना स्वावलंबनाचे धडे मिळावेत, त्यांनी आपल्या आवडीचे छंद जोपासावे, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, पर्यावरणाची नाळ जुळावी व त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी या आगळ्यावेगळ्या शिबिराचे 19 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये वयोगट सहा ते नऊ सकाळी ९ ते दु २ व १० वर्ष व त्यापुढील वयोगटातील मुलांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल ,कसाल एसटी स्टँड च्या मागे येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी कणकवली, कुडाळ, ओरस पणदूर, सुकळवाड, ओसरगाव येथून वाहनाची सुविधा आहे.
या शिबिरात आपल्याला मिळणार तंत्रशिक्षण, विज्ञान, भाषा,पर्यावरण ,संशोधन ,
कला, अरण्य वाचन , अग्रिकल्चर, कंपोस्टिंग ,म्युझिक, डान्स सायकलिंग , पारंपारिक खेळ , रॅपलिंग ,व्हॅली क्रॉसिंग, फुलपाखरांचे जग, आयुका पुणे येथील खगोलशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली टेलिस्कोप बनविण्याचे तंत्र, , आकाश दर्शन, विविध प्रकारची सरबतं , सॅलड व लोणचं बनविणे, रोबोटिक्स , मिनी एक्वेरियम, नारळाच्या झावळ्याच्या झोपड्या बनवणे आणि हो कॅलिग्राफी ,वारली पेंटिंग, पतंग बनविणे सुद्धा. तसेच वाचनाचा आनंदही आपण लुटणार आहात . बाल नाट्य ही आपण करणार आहोत, तसेच आपण प्रत्यक्ष भेटीतून जाणून घेणार आहात निसर्गातील अद्भुत गोष्टी
या शिबिरात आपल्याला मिळणार ज्ञानाचा महाखजिना सोबत मौजमस्ती
आणि बरं का? कोकणातील स्थानिक पौष्टिक स्वादिष्ट दुपारचे जेवण . याबरोबरच आपण अनुभवणार आहात देश- विदेशातील विविध नाण्यांचा संग्रह.
आणि समारोपाच्या दिवशी सर्व शिबिरार्थी भरवणार माय माती, माय महोत्सव फूड फेस्टिवल
मग वाट कसली बघताय? त्वरित नाव नोंदणी करा.
7507202063/ 8329513860/
जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांनी या आगळ्यावेगळ्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकामार्फत आवाहन करण्यात येत आहे