खारेपाटण एस टी बस स्थानकाची रत्नागिरी विभागीय समिती कडून पाहणी…

स्वछ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत करण्यात आली पाहणी

हिंदूहृदय सम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे स्वछ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ रत्नागिरी विभगिय समितीच्या वतीने नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण एस टी बस स्थानकाला रत्नागिरी विभाग नियंत्रक श्री प्रज्ञश बोरसे यांनी सदिच्छा भेट दिली. व एस टी बस स्थानक परिसराची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत सर्वेक्षण समितीमध्ये म.रा.एस टी महामंडळ रत्नागिरी उपयंत्र अभियंता श्रीम. मृदुला जाधव,कामगार अधिकारी रत्नागिरी श्री विलास चौघुले,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर,प्रवासी मित्र – शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. एस टी बस स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीचे खारेपाटण एस टी बस स्थानक वाहतूक नियंत्रक प्रमुख श्री मनोहर चव्हाण यांनी स्वागत केले.व खारेपाटण एस टी बस स्थानक सोयी सुविधा विषयी माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील सर्वच एस टी बस स्थानकांचे स्वछ सर्वेक्षण अंतर्गत परीक्षण केले जात असून स्वछ व सुंदर बस स्थानक अंतर्गत खारेपाटण एस टी बस स्थानकाची आतापर्यंत तीन वेगवेगळ्या समितीने पाहणी केली असून आज पाहणी करण्यासाठी आलेली ही चौथी समिती आहे.या समितीचे प्रमुख प्रदनेश बोरसे यांनी खारेपाटण एस टी बस स्थानक स्वच्छते विषयी समाधान व्यक्त केले असून काही त्रुटीबाबत सूचना देखील केली आहे.
खारेपाटण एस टी बस स
स्थानकाच्या संपूर्ण परिसराची पाहणी यावेळी या समितीच्या वतीने करण्यात आली.समितीतील सदस्यांकडे १०० गुणाची प्रश्नावली देण्यात आली होती. या गुनांच्या आधारे राज्यातील सर्वांग सुंदर व स्वछ बसस्थानक ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!