किरणजी सामंत लांबी रेस का घोडा!

त्यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे सर्व नेते सक्षम

महायुतीचे सगळेच कार्यकर्ते आम्ही आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करत आहेत.शिवसेना ज्येष्ठ नेते,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी आमदार प्रमोद जठार असे सर्वच महायुतीचे नेते,कार्यकर्ते,पदाधिकारी महायुतीचा उमेदवार निवडून यावा. मोदींचे हात बळकट व्हावे. आणि इकडचा खासदार हा मोदींच्या विचारांचा निवडून यावा या दृष्टिकोनातून प्रचार करत आहोंत. श्री.किरण सामंत यांची भेट भाजप नेते उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेला माणूस हा परत येताना खाली हात कधीही जात नाही. किरण जी सामंत हे राजकारणातील “लांबी रेस का घोडा आहेत.”.किरण सामंत यांची कोणीही चिंता करू नये, त्यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे सर्व नेते सक्षम आहेत.असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत एक प्रश्नावर बोलताना सांगितले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!