खारेपाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील नगर खारेपाटण येथे भारतीय घ्टनेचे शिल्कार, महामानव,बोधिसत्व,विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
बुद्धविहार,पंचशील नगर खारेपाटण येथे संपन्न होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सकाळी ९.३० वाजता पंचशील ध्वजारोहण,सकाळी १०.०० वाजता खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला विविध मान्यवरांच्या शूभहस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन सकाळी १०.३० वाजता सामुदायिक धम्मपुजा पाठ,
सकाळी ११.३० वाजता मान्यवरांचे स्वागत व मनोगत,दुपारी १२.०० वाजता शालेय विद्यार्थी करीता सामान्य ज्ञान स्पर्धा,सायंकाळी ४.०० वाजता स्थानिक मुलांसाठी विविध फनी गेम्स चे आयोजन,सायंकाळी ६.३० वाजता धम्मप्रवचन – प्रमुख मार्गदर्शक धम्मचारी – अमोघसागर खेड,रत्नागिरी रात्री.८.३० भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम
तरी या जयंती कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण