इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला प्रारंभ

उत्सवात सुप्रसिद्ध गायकांची राहणार पर्वणी
आचरा–अर्जुन बापर्डेकर इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे.या वर्षी सुप्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवूंडी धारवाड, पंडित कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली इंदोर,आनंद भाटे पुणे यांच्या गायनाची रसिकांना पर्वणी राहणार आहे.
मंगळवारी सकाळी मंदिरासमोर गुढीउभारण्यात आली.त्यानंतर वाजतगाजत कानविंदे यांच्या वाड्यावरुन श्रीरामाची उत्सव मुर्ती आणून मंदिरातील नंदीचौकावर प्रतिष्ठापना केल्यावर या उत्सवाला सुरुवात वाखणकर जोशी, सरजोशी यांनी संवस्तर पंचागवाचन केले . मंदिरातील नंदी चौकावर मुर्ती प्रतिष्ठापनेनंतर दुपारी रामेश्वर मंदिराला रघुपती आरतीसह प्रदक्षिणा घातल्या गेल्या सायंकाळी माखण,दुपारी आणिसायंकाळी दरबारी गायन रात्रौ पालखी प्रदक्षिणा आणि त्यानंतर किर्तन असा दैनंदिन कार्यक्रम ललितोत्सवापर्यंत चालतो.या वर्षी हभप विनोद गोखले वैभववाडी
यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. त्यांना हार्मोनियम साथ आनंद लिंगायत व तर तबला साथ किरण लिंगायत करणार आहेत.
शुक्रवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता गायक अर्णव बुवा यांचं गायन होणार आहे शनिवारी १३ एप्रिल रोजी मालवण येथील सुप्रसिद्ध गायक दिलीप ठाकूर यांचे सकाळी दहा वाजता गायन होणार आहे त्यांना ऑर्गन साथ भालचंद्र केळुस्कर यांची लाभणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता अशोक नाडगीर यांचं गायन होणार आहे त्यांना पेटी साथ आनंद लिंगायत तर तबला साथ किरण लिंगायत करणार आहे. रविवार १४ एप्रिल रोजी मिठबाव येथील गायक सुधांशू सोमन यांचं गायन होणार आहे. सोमवार १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता गायक जयतीर्थ मेवुंडी धारवाड यांचे गायन होणार आहे. त्यांना संवादिनी साथ राया कोरगावकर तर तबला साथ रामकृष्ण करंबेळकर करणार आहेत. मंगळवार १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध गायक पंडित कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश्वर कोमकली यांचे गायन होणार आहे .त्यांना संवादिनी साथ राया कोरगावकर तबला साथ मयांक बेडेकर यांची लाभणार आहे.बुधवार १७ एप्रिल रोजी सकाळी राम जन्माचे किर्तन कीर्तनकार ह भ प मिलिंद बुवा कुळकर्णी हे करणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे पुणे यांचं गायन होणार आहे संवादिनी राया कोरेगावकर तबला साथ रामकृष्ण करंबेळकर यांची लाभणार आहे. सोमवार २२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त माऊली प्रतिष्ठान पाट पंचक्रोशी, राम कृष्ण हरी प्रकाशित लंबोदर प्रोडक्शन मुंबई प्रस्तुत मनाला चटका देणारे दोन अंकी नाटक महानिद्रा हे नाटक होणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन इनामदार रामेश्वर संस्थान कसबा आचरे देवस्थान कमिटी अध्यक्ष मिलिंद मिराशी सचिव अशोक पाडावे व सर्व समिती सदस्यांनी केले आहे