रेल्वे स्टेशननजीक ट्रान्सफार्मर स्फोटाने बाधित ग्राहकांना तात्काळ नुकसानभरपाई द्या

ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांची मागणी

कणकवली रेल्वे स्टेशन परिसर नूतनीकरण करताना शिफ्ट केलेल्या ट्रान्सफार्मरची ट्रायल घेताना 8 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता स्फोट झाला. त्यामुळे ट्रान्सफार्मर वरून वीजपुरवठा असलेल्या परिसरातील विजग्राहकांच्या घरातील फ्रीज टीव्ही मिक्सर इस्त्री एसी आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून गेल्या. या घटनेत कणकवली रेल्वे स्टेशनलगत च्या ग्रामस्थांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. ट्रान्सफार्मर ची ट्रायल घेताना आवश्यक व्होल्टेज बाबत खबरदारी विजवीतरण अधिकाऱ्यांनी घेतली नव्हती.त्याचा भुर्दंड ग्रामस्थांना बसला आहे. त्यामुळे नुकसानी चे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना उबाठा चे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी विजवीतरण चे उप कार्यकारी अभियंता बगडे यांच्याकडे केली आहे. मुळात हेवी ट्रान्सफार्मर शिफ्ट करताना सर्वतोपरी खबरदारी घेण्याची जबाबदारी ही विजवीतरण अधिकाऱ्यांची आहे. रेल्वे स्टेशन परिसराचे नूतनीकरण करत असतान रस्त्यात असलेला ट्रान्सफार्मर शिफ्ट करण्यात आला होता. या ट्रान्सफार्मर वरून घरगुती तसेच वाणिज्य वापरातील शेकडो विजग्राहकांना वीजपुरवठा केला जतो. काल रात्री झालेल्या स्फोटाने या सर्व विजग्राहकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व विजग्राहकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आपत्कालीन बाब म्हणून त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी पारकर यांनी केली आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!