महिलांनी एकत्र येत आर्थिक उन्नती साधा

कणकवली मुख्याधिकारी विशाल खत्री यांचे प्रतिपादन
कणकवली नगर पंचायतच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
कणकवली नगरपंचायत कणकवली दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAYNULM ) स्थापित कनकसिंधू शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कणकवली नगरवाचनालय हॉल येथे दिनांक- 13 मार्च 2024 रोजी या कार्यक्रमचे उदघाटन विशाल खत्री भा.प्र.से सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मुख्य अधिकारी कणकवली नगरपंचायत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी अमोल अगम, लेखा अधिकारी प्रियांका सोन्सूरकर, कनकसिंधु शहर स्तर संघाचे अध्यक्ष सुचिता पालव, श्रीम अर्पणा कांबळे, नगरपंचायत कर्मचारी, कनकसिंधू शहर स्तर संघाचे कार्यकारी सदस्य व बचत गटातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बांबू हस्तकाला आजही जोपासनाऱ्या व त्यापासून विविध वस्तू बनविणाऱ्या श्रीम.अर्पणा कांबळे यांचा सत्कार मा. विशाल खत्री भा.प्र.से यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, एवढ्या मोठया संख्येने महिला एकत्र येणे ही कौतुकास्पद गोष्ट असून अशा प्रकारे महिलांनी एकत्र येत आपली व आपल्या कुटुंबाची सामाजिक व आर्थिक प्रगती करून घेणे आवश्यक आहे. या सास्कृतिक कार्यक्रमाचा सर्वांनी मनमुराद आनंद घ्यावा असे म्हणतं त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत उपस्थित महिलांन सोबत पर्यावरणाची शपत घेण्यात आली. त्यांना कापडी पिशव्याच वाटप करत प्लास्टिक पिशव्याचा वापर टाला असं सांगण्यात आले. तसेच नगरपंचायतमधील महिला स्वछता कर्मचारी यांना सन्मान पत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागच्या ध्वजा उचले,वर्षा कांबळे,रुचिता ताम्हणकर,निकिता पाटकर, माधुरी डगरे, ज्योती परब, अस्मिता चव्हाण उपस्थित होत्या. कार्यक्रमची प्रस्तावना अमोल भोगले तर सूत्रसंचालन सिद्धी नलावडे यांनी केली.
कणकवली, प्रतिनिधी