आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये रंगली चिमुकल्यांची वेशभूषा स्पर्धा.

कणकवली/मयुर ठाकूर.

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे प्रशालेत चिमुकल्यांची वेशभूषा स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. बालकलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी ही स्पर्धा आयडियल स्कूल मध्ये घेतली जाते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख सौ.रुची कवटकर मॅडम यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे दीप प्रज्वलन पार पडले. नर्सरी यु.के.जी ,एल.के.जी च्या मिळून एकूण 33 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विविध वेशभूषा साकारणाऱ्या चिमुकल्यांनी सर्वांचीच मनी जिंकली.
स्पर्धेचे विजेते विद्यार्थी

1).प्रथम कु .ईश्वरी गोठणकर हिने अर्धनारी नटेश्वर वेशभूषा साकारली होती
2)द्वितीय कु.रियांश पोयेकर ट्राफिक रुल वेशभूषा
3) तृतीय कू.सार्थक सावंत शिवाजी महाराज वेशभूषा *

*उत्तेजनार्थ* 
  1) *अलिषा शहा* 

भाजीवाली वेशभूषा
2) असद खान
सोलर सिस्टिम वेशभूषा
या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल,सल्लागार डीपी तानावडे सर, आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना शेखर देसाई, तसेच परीक्षक म्हणून ज्योती मोरे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचारी या स्पर्धेला उपस्थित होते.

error: Content is protected !!