नागवे मध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन

रात्री वाहनाच्या प्रकाशात बिबट्याने रस्त्यावर दिली रुबाबशीर पोझ

आज सायंकाळी पुन्हा जंगलमय भागात बिबट्या दिसला

कणकवली तालुक्यात नागवे खालची पटेल वाडी या भागात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. गाडीच्या लाईट मध्ये हा बिबट्या रस्त्यावर अगदी रुबाबात पोझ देत काही वेळ थांबला व त्यानंतर बिबट्या जंगलमय भागात पसार झाला. त्यानंतर आज शनिवारी सायंकाळच्या सुमारास देखील नागवे परिसरात जंगलमय भागात बिबट्याने पुन्हा एकदा दर्शन दिले. काही दिवसांपूर्वी कोंडये भागात आढळलेला हाच बिबट्या असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली असून, एका डोळ्याने हा बिबट्या अंध असल्याचे समजते. नागवे भागात बिबट्या चे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील ग्रामस्थांमधून केली जात आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!