मराठा समाज भगिनी मंडळ तर्फे ६ मार्चला विविध स्पर्धांचे आयोजन

जागतिक महिला दिनाचे औचित्य

प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक महिला दिनानिमित्त मराठा समाज भगिनी मंडळ कुडाळच्या वतीने मंगळवार दि. ६ माराच २०२४ रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे
सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संचलित मराठा समाज भगिनी मंडळ कुडाळच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिलांसाठी पाककला व फनी गेम्स स्पर्धा आयोजीत केलेल्या आहेत. बुधवार 6 मार्च रोजी मराठा हॉल येथे सायं 3:30 वाजता स्पर्धा होणार आहेत पाककलेसाठी विषय गव्हापासून बनविलेले पदार्थ असा आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी 4 मार्चपर्यंत निधी दळवी 9112340330 वेदिका सावंत 8830834453 येथे नावनोंदणीसाठी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा समाज भगिनी मंडळ कुडाळ अध्यक्ष प्रज्ञा राणे यांनी केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!