साकेडीच्या सुपुत्राची दक्षिण आफ्रिकेमध्ये गगन भरारी

पायलट बनत केली स्वप्नपूर्ती
साकेडी मध्ये सुधांशू शिरसाट याचे केले जातेय कौतुक
कणकवली तालुक्यातील साकेडी गावचा सुपुत्र सुधांशू अजय शिरसाट हा दक्षिण आफ्रिकेत विमानाचा पायलट बनला आहे. त्यामुळे त्याच्या बद्दल साकेडी गावातील कौतुक होत आहे.
सुधांशू याचे सुरुवातीपासूनच विमानाचे पायलट बनण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याचे वडील अजय शिरसाट यांनी साथ दिली. दोन वर्षे दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याने पायलटचे प्रशिक्षण घेतले. अलीकडेच सुधांशु हापायलटची परीक्षा पास झाला शुक्रवारी तो दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत पोहचला. सुधांशू यांचे शिक्षण मुंबईत झाले. सुधांशुह कणकवलीचे माजी सभापती संजय शिरसाट यांचा नातू आहे .सुधांशू पायलट ची परीक्षा पास झाल्याचे कळताच, त्याच्या मायभूमी साकेडी गावात कौतुक करत त्याचे अभिनंदन केले जात आहे.






