भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल दारिस्ते गावच्या सुपुत्राचा युवा सेनेकडून सन्मान

वाजत गाजत काढली मिरवणूक
भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल दारिस्ते गावचे सुपुत्र श्रीकांत ठाकूर यांचा युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह दारिस्ते ग्रामस्थांनी जल्लोषात सत्कार केला. दारिस्ते गावच्या सुपुत्राने देशसेवेची उचललेले पाऊल हे उल्लेखनीय असून गावासाठी श्रीकांत ठाकूर हे आदर्शवत असल्याचे उद्गार उत्तम लोके यांनी काढले. फुलांनी सजवलेली बैलगाडी, घरासमोर रांगोळ्यांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी, औक्षण, फुलांचा वर्षाव, ढोल ताशांचा गजर अन भारत माता की जय च्या निनादात आगळ्या वेगळ्या वातावरणाने दारिस्ते गावातील पवारवाडी आणि नमंसवाडी दुमदुमली. श्रीकांत छत्रूगन ठाकुर यांचा उत्तम लोके यांचा हस्ते करण्यात आला. त्यावेळीं उत्तम लोके यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते म्हणाले श्रीकांत ठाकूर यांनी केलेल्या मेहनतीचे चीज झाले. आणि त्यांचा मेहनतीला ग्रामदेवतांनी आशीर्वाद दिले.
कणकवली /प्रतिनिधी