ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचे आव्हान

डॉ. सई लिंगवत यांचे प्रतिपादन

‘ ग्रामीण भागात गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याचे आव्हान अधिक महत्वाचे असुन सदर प्रश्नाचे गांभिर्य व व्याप्ती लक्षात घेता फक्त लहान योजनांवर लक्ष केंद्रीत करणे पुरेसे नाही तर सार्वजनिक आरोग्य सेवेचे सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदाईत्व निर्माण होण्याची गरज आहे
रोग शारीरिक स्वच्छता न पाळल्यामुळे निर्माण होतात. परजीवी जंतू खरूज, फोड, दात किडणे,अतिसार हे विकार व्यक्तिगत स्वच्छता न पाडल्यामुळे होतात. व्यक्तीने स्वच्छतेचे जर पालन केले तर हे रोग आपल्याला टाळता येऊ शकतात.’
असं प्रतिपादन शासकीय वैद्यकीय अधिकारी व जनसेवा प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सई लिंगवत यांनी महाराष्ट्र राज्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, विद्यार्थी कल्याण विभाग, बहि:शाल शिक्षण मंडळ तर्फे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते ऍड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे महाविद्यालय व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय चर्चासत्र व व्याख्यानमाले प्रसंगी
‘ ग्रामीण आरोग्य व स्वच्छता ‘ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात केले.

तर दुसऱ्या सत्रातील चर्चासत्रात
‘ ग्रामीण युवक दशा व दिशा ‘ या विषयावर बोलताना

‘ ग्रामीण तरुणांना शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे प्रशिक्षित करणे आणि उद्योजकीय क्षमता, रोजगारक्षमता आणि आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी कौशल्य उपक्रम राबविले पाहिजेत. असं सांगून ग्रामीण युवकांनी आधुनिक शेती कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे असं प्रा. वैभव खानोलकर यांनी सांगितलं.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समुळ उच्चाटन करण्यासाठी जादुटोणा विरोधी कायदा संमत केला असुन या कायद्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसार व प्रचार व जनजागृती करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी शाळा महाविद्यालये यांना पत्र दिले असून त्याचाच भाग म्हणून अनिस सिंधुदुर्ग जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोणा विरोधी कायद्याचे प्रात्यक्षिकांसह अंधश्रद्धा निर्मूलन व कायदा विषयक व्याख्यान दिले.

तर व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. श्रध्दा बाविस्कर यांनी
‘ स्त्रीभ्रूणहत्या, सामाजिक परिणाम ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना लिंगनिदान कायद्याबाबत सविस्तर माहिती देऊन ‘ हुंडा हि समाजात लागलेली किड असुन स्त्रीभ्रूणहत्या ही या मानसिक रोगा मागील हे एक कारण असून स्त्रीभ्रूणहत्या मुळे सामाजिक असंतुलन निर्माण होऊन सामाजिक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतील.
असं सांगितले.

दोन दिवस आयोजित केलेल्या या चर्चासत्र व व्याख्यानमालेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी. केळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लोकनेते ऍड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. संजीव लिंगवत, डॉ.राखी माधव, डॉ. श्रीराम हिर्लेकर, डॉ.सतीश पाटील, डॉ. सोनाली सावंत, डॉ. पुजा कर्पे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन डॉ.संजीव लिंगवत यांनी तर स्वागत डॉ. सोनाली सावंत व डॉ. सतिश पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते शिवराम आरोलकर, साहस प्रतिष्ठान अध्यक्षा रुपाली पाटील, ग्रंथपाल निकिता गोलतकर, शेखर साळगावकर, हेलन आल्मेडा, दिलीप नाईक, राजा रेडकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

वेंगुर्ले(प्रतिनिधी)

error: Content is protected !!