श्री सत्यवान यशवंत रेडकर यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शाळांमधील विदयार्थ्यांना केले २४९वे नि:शुल्क मार्गदर्शन

महापालिका आयुक्त, डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार, शिक्षण विभागाचे उप आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व मालमत्ता विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या सहकार्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा व मराठी आणि हिंदी माध्यमाच्या हिंदी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता ८ वी ते १० वी च्या एकूण २१० विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉल मध्ये करण्यात आले होते.

शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, स्पर्धा परीक्षांबद्दल आकर्षण निर्माण होऊन स्पर्धा परीक्षांसाठी काय करावे व परीक्षेची कशी तयारी करावी ? याचे ज्ञान मिळावे या दृष्टीकोनातून सदर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन तिमिराकडून तेजाकडे या संस्थेमार्फत करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष, श्री. सचिन यशवंत रेडकर हे याप्रसंगी उपस्थित होते.

या प्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध उच्चविद्याभूषित, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत हसत खेळत व आनंदमयी वातावरणात मोलाचे सविस्तर मार्गदर्शन केले. श्री सत्यवान यशवंत रेडकर सरांचे हे २४९वे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान होते.

या प्रसंगी महापालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे, विस्तार अधिकारी लक्ष्मण जाधव, क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बिना सिंह व संबंधित शाळेचे शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून शंका दूर करून घेतल्या तसेच मुलींनी व शिक्षकांनी स्पर्धा परीक्षेबाबत स्वमत व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नेतीवली येथील माध्यमिक शिक्षक संतोष पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिलीप चेडे यांनी केले.

error: Content is protected !!