विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली : इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ
कणकवली/मयुर ठाकूर
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळेतील सन २०२३ – २४ वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रशालेतील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा समारंभ आयोजित केला . यावर्षी प्रशालेने विद्यार्थ्यांचे ज्ञान विकसित होण्यासाठी एप्रिल महिन्या पासूनच जादा तासिका आयोजित करून दहावीचे सर्व विषयांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित करून ज्ञान साधना वृद्धिंगत करून एससीसी बोर्डाची सर्वतोपरी तयारी करून घेतली . वर्षभरात विद्यार्थी -पालक यांच्या सभा आयोजित करून अभ्यास आणि परीक्षा या विषयी विविध उपक्रम राबवून मार्गदर्शन केले गेले . प्रशालेत स्कॉलर विद्यार्थी वर्ग आयोजित करून विशेष मार्गदर्शन करून पेपर सराव परीक्षा आयोजित करून स्कॉलर विद्यार्थांची ज्ञानकक्षा उंचाविण्यात प्रशालेतील सर्व अध्यापकांनी अधिक मेहनत घेतली . तसेच मध्यम आणि अभ्यासात कमी गती असलेल्या विद्यार्थ्यासाठी विशेष अभ्यासिका आणि मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करून ज्ञानसाधनेची पातळी उंचाविण्यात आली . या वर्षाच्या विद्यार्थी वर्गामध्ये शिस्त ‘संयम आणि कष्ट करण्याची तयारी दिसून आली . प्रशालेतील सर्व अध्यापकांनी दहावीच्या विद्यार्था साठी अधिक परिश्रम घेऊन वार्षिक परिक्षेची विशेष तयारी करून घेण्यात आली . माध्यमिक शाळेतील पहिला टप्पा पूर्ण करून सर्व विद्यार्थी जीवनाच्या आणि भविष्याच्या उन्नत जगात प्रवेश करत आहेत म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी शुभेच्छा देतांना व्यायाम ‘वाचन ‘ आणि चिंतन यांचे भान ठेवून जीवनाची वाटचाल करावी असा संदेश दिला . पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम यांनी विद्यार्थी जीवनात शिस्त आणि अभ्यास यांचे महत्व विषद केले जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे सर यांनी परिक्षेला जाताना कोणती विशेष काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले श्री संदिप कदम सर यांनी स्पर्धा परीक्षा भावी जीवनात किती महत्वाचे आहेत या विषयी मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या . श्री सिंगनाथ सर श्री शेळके जेजे सर अमोल शेळके सर ठाकूर सर खरात सर आणि दहावीचे विद्यार्थी यांनी प्रशाले विषयी मनोगत व्यक्तकरून आपल्या भावना प्रकट केल्या . या शुभेच्छा कार्यक्रमाला विशेष सहकार्य मधुरा कॅम्पूटरच्या संचालिका सौ रश्मी बाईत मॅडम यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांनाअल्पोपहार देवून सहकार्य केले . आभार वर्गशिक्षक श्री अमोल शेळके सरांनी मांडले व कार्यक्रमाची सांगता झाली .