देवगड न्यायालयाच्या इमारतीचा कोनशीला समारंभ उत्साहात
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्य न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण रा. गवई यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.नितीन बोरकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.हेमंत गायकवाड, आमदार नीतेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हाधिकारी श्री.किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सौरभ कुमार अग्रवाल, व आदी मान्यवर उपस्थित होते.
देवगड प्रतिनिधी