खारेपाटण मध्ये भाजपच्या “गावचलो अभियानाला प्रारंभ….

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारची यशोगाथा तळागाळापर्यंत जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि देशातील जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकण्याच्या दृष्टीने भाजप पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या आदेशाने राबविण्यात येत असलेल्या ‘गाव चलो अभियानाला खारेपाटण येथील श्री देव कालभैरव मंदिरात नुकताच भाजप पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
भाजप पक्षाचे कार्यकर्ते व शिडवणे सरपंच श्री रवींद्र शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थीतीत गाव चलो अभियानाला सुरवात करण्यात आली. यावेळी खारेपाटण शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल, खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत,विद्यमान उपसरपंच महेंद्र गुरव,ग्रा.पं.सदस्य श्री जयदीप देसाई,,सौ दक्षता सुतार,राजेंद्र वरुणकर,माजी सरपंच वीरेंद्र चीके,भाजपा ओबोसी तालुका महिला अध्यक्ष सौ उज्ज्वला चिके,खारेपाटण सोसायटी संचालक श्री श्रीधर गुरव आदी प्रमुख भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप पक्षाच्या वतीने प्रमुख पदाधिकारी यांनी खारेपाटण मधील सर्व बूथ निहाय नागरिकांच्या घरोघरी प्रत्यक्ष भेटी देऊन गाव चलो अभियानाची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





