राज ठाकरे यांचा फोटो लावलेला कणकवलीतील “तो” बॅनर चर्चेत!

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संदर्भातील कारवाईनंतर लागला होता बॅनर

अखेर शुक्रवारी सकाळी बॅनर हटवला गेला

मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांचा मनसे पक्षाशी कोणताही संबंध नाही अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिल्यानंतर कणकवली येथील श्रीधर नाईक चौक या ठिकाणी काल गुरुवारी रात्री मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा फोटो असलेला बॅनर व त्या बॅनरवर उशिरा का होईना योग्य निर्णयाबद्दल हार्दिक अभिनंदन असा आशय असलेला बॅनर लावला गेला होता. कणकवली शहरात लावलेला हा बॅनर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर पक्षांतर्गत केलेल्या कारवाईनंतर कणकवली शहरात हा बॅनर लावला गेल्याने त्याची राजकीय गोटात देखील चर्चा सुरू झाली होती. मात्र या कारवाईनंतर श्री उपरकर यांनी पक्षाकडे आपला राजीनामा दिल्याचे प्रसिद्धी पत्र दिले होते. त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कणकवली मध्ये राज ठाकरेंच्या निर्णयाबद्दल अभिनंदन करणाऱ्या बॅनर ची चर्चा मात्र कणकवलीत आज दिवसभर सुरू होती. दरम्यान आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात हा बॅनर काहीं कडून हटवला गेला. त्यामुळे बॅनर हटवला गेला तरी सोशल मीडियामध्ये मात्र चर्चा अजूनही सुरू आहेत.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!