खारेपाटण बंदरगाव येथे घर चलो अभियाना अंतर्गत भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन भेटी

भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीने महाविजय – २०२४ अंतर्गत कणकवली विधानसभा मतदार संघातील बूथ स्तरीय घर चलो अभियानाला खारेपाटण बंदरगाव येथील बूथ क्रमांक १९७ येथे भाजप शक्ती केंद्र प्रमुख श्री सूर्यकांत भालेकर यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच गृहभेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी खारेपाटण बंदरगाव येथील ग्रामस्थ श्री रफिक नाईक, मुबिन सारंग,इस्माईल मुकादम,सुरेंद्र कोरगावकर,योगेश गोडवे,रमेश ढेकणे,गौरव ढेकणे,धोंडीराम साटविलकर,रामदास जाधव,सतीश तोरसकर,प्रमोद साठविलकर,विजया कांबळे,गीता साठविलकर,संतोष आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात आलेल्या घर चलो अभियानाला खारेपाटण बंदरगाव येथील नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून जनतेच्या असलेल्या विविध समस्या भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचवून त्या सोडविणार असल्याचे भाजप कार्यकर्ते श्री सूर्यकांत भालेकर यांनी यावेळी सांगितले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





