पोलीस निरीक्षकांना दिल्या शुभेच्छा

कणकवली, आज दिनांक ०९/०२/२०२४ रोजी कणकवली पोलीस निरीक्षक म्हणून नव्यानेच रूजू झालेले पोलीस निरीक्षक मारूती जगताप साहेब यांना शुभेच्छा दिल्या.
माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, व्यावसायिक सुनिल काणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस हवालदार विनोद चव्हाण उपस्थितीत होते. माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी अविनाश गावडे, प्रभाकर कदम, बाबुराव घाडिगावकर तसेच इतर सर्व मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थितीत होते.
उपस्थितीत सर्वांनी साहेबांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.