कणकवली,सांगवे,असलदे,फोंडाघाट उपकेंद्रांवरीलवीज पुरवठा सोमवारी ९ ते ५ बंद राहणार

महावितरणचे सहकार्य करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग : १३२-११०/३३ के.व्ही. कणकवली अतिउच्चदाब उपकेंद्रामधून निघणाऱ्या ३३ के. व्ही. मेन बसवरील तांत्रिक देखभाल-दुरुस्ती कामामुळे ३३/११ के.व्ही. कणकवली, सांगवे, असलदे आणि फोंडाघाट या चार उपकेंद्रांचा विद्युत पुरवठा सोमवार दि. २९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सदरचे काम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा लवकर चालू करण्यात येईल. तरी कृपया वरील उपकेंद्रावरून वीज पुरवठा होणाऱ्या सर्व वर्गवारीतील लघु व उच्चदाब वीज ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे. कणकवली विभागांतर्गत येणाऱ्या ३३ के.व्ही. देवगड, ३३ के.व्ही. कणकवली एक व दोन या वाहिनीवरून वरील चार उपकेंद्राना विद्युत पुरवठा होतो.
कणकवली, प्रतिनिधी