अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणी वागदेतील तरुणावर गुन्हा दाखल

इंस्टाग्राम वरून युवतीशी झाली होती ओळख
संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात उद्या न्यायालयात हजर करणार
इंस्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर प्रेम संबंध निर्माण झाले व यातून वागदे येथील नातेवाईकाकडे राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार वागदेतील 23 वर्षीय तरुणावर कणकवली पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी असलेला तुषार सत्यवान परभु (वय 23 सध्या राहणार वागदे, मूळ देवगड मुटाट) याची या 14 वर्षीय अल्पवयीन युवतीशी इंस्टाग्राम वरून ओळख झाली व यातून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. यामध्ये 14 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत या युवकाने त्या युवतीवर सातत्याने शारीरिक अत्याचार केले. अशी फिर्याद त्या युवतीने कणकवली पोलिसात दिली आहे. सदर घटना ही संशयित आरोपी असलेल्या तुषार सत्यवान परभु हा राहत असलेल्या नातेवाईकाच्या घरी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार कणकवली पोलसात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 376, 376 (3), 376 (2 j), (2 n) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे करत आहेत.
कणकवली/ प्रतिनिधी