सिंधुदुर्गातील ओबीसींच्या प्रश्नाबाबत तातडीने बैठक घ्या!

माजी आमदार प्रमोद जठार यांची इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हयातील मोठया प्रमाणात असलेल्या वैश्यवाणी जाती समाजातील बांधवांना ओबीसी दाखले मिळण्याकामी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबतची खंत वैश्यवाणी समाजाच्या विविध संस्थांनी पत्राद्वारे सरकारी सेवेस कळवूनही अद्यापी त्यांना न्याय मिळालेला नाही.
तरी आपण वैश्यवाणी जाती समाजाबाबत स्पष्टीकरण संदर्भित परिपत्रक क्रमांक १-१०/२००७ प्र.क्र. १७७/मावक्र-५, दिनांक २०/०६/२००८ पुन:र्स्थापित संबंधित विभाग व समाज मध्यवर्ती संस्थेची बैठक आयोजित करावी, अशी मागणी सिंधुदुर्गातील माजी आमदार प्रमोद जठार यांनी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कणकवली, प्रतिनिधी