हायवे प्रशासन जागे होणार की नाही-सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांचा सवाल
कणकवली/मयुर ठाकूर
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर “छत्रपती शिवाजी महाराज चौक” तेथील व्यावसायिकां साठी दिली भेट,
*छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यावसायिक आज गेले ४ ते ५ महिने आपआपल्या दुकानासमोर स्वतः चे पैसे खर्च करून रात्री च्या वेळी कोणी वयस्कर, महिला वर्ग हायवे वर पायी चालत असताना धडपडु नये, म्हणून लाईट रात्रभर सुरू ठेऊनच आपआपल्या घरी जातात, आणि सामान्य नागरिकां करिता सामाजिक जाणिवेतून लाईट बिल भरतात,
*सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की, गेले ४ ते ५ महिने नगरपंचायत चे निवृत्त कर्मचारी भाई साटम, दिपनाईक, आदी व्यापारी वर्ग सातत्याने आपण कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या, आणि आमच्या व्यथा हायवे प्रशासनाला कळवा,
*त्यामुळे च आज भेट देऊन, त्यांच्या भावना या सामान्य नागरिकां करिता च आहेत, तरी हायवे प्रशासनाने यांच्या केलेल्या विनंती ला मान देऊन, त्वरित दखल घ्यावी च, आणि उड्डाण पुलाच्या वरील आणि सर्व्हिस रोड च्या दोन्ही बाजूंना बंद असलेल्या लाईट त्वरित अद्ययावत करून, सातत्याने चालू राहतील, याची दखल घ्यावी, हि विनंती,
*यावेळी भाई साटम यांनी असे म्हटले की, ज्यावेळी नगरपंचायत प्रशासना कडे हे पाहण्याची व्यवस्था होती, त्यावेळी एक जरी कुणा नागरिकाची तक्रार आली, तरी ती आम्ही जलदगती ने अमंलबजावणी करत होतो, आज या सर्व गोष्टी हायवे प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले मुळे च समस्त सामान्य नागरिकांना काळोखाच्या साम्राज्यातून रात्री अपरात्री पायी प्रवास करणे नित्यनेमाचे झाले आहे, तरी कृपया संबंधित हायवे प्रशासनाने यांची गंभीरपणे, त्वरित दखल घ्यावी,
*सामाजिक कार्यकर्ते सी आर चव्हाण यांनी हि ,परखड शब्दात संबंधित हायवे प्रशासना सुनावले, आणि ताबडतोब या विषयावर गांभिर्याने विचार करावा, आणि व्यावसायिक, सामान्य माणसाला रात्री अपरात्री सर्विस रस्त्यावर चालताना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे म्हटले,
*याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यावसायिक बंधू भगिनी तसेच रिक्षा व्यावसायिक हि उपस्थितीत होते,
*