संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ३० रोजी “आयुर्वेद : दिनचर्या आणि घरगुती उपचार” कार्यशाळा

वनौषधी प्रदर्शन देखील मिळणार पाहायला
वैद्य सुविनय दामले यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन
प्रतिनिधी । कुडाळ : येथील संत राऊळ महाराज FC महाविद्यालयामध्ये “आयुर्वेद:दिनचर्या व घरगुती उपचार”कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी स.०९.३० ते सायं.४.३० या वेळेत महाविद्यालयामध्ये हि कार्यशाळा होणार आहे. तसेच वनौषधी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार आहे.
आजीबाईंचा बटवा ही संकल्पना कालबाह्य होत चालली आहे. आपल्या अवती भवती असणाऱ्या औषधी वनस्पती आपल्याला ओळखेनाशा झाल्यात किंवा त्या कशा वापराव्यात हे माहीत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आपली आयुर्वेदीय दिनचर्या कशी असावी, घरच्या घरी साधी आयुर्वेदिक औषधे कशी बनवता येतील याची तज्ञा व्यक्ती कडून सर्वसामान्यांना माहिती करून द्यावी या उद्देशाने संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या मार्फत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी स.०९.३०ते सायं.०४.३०या वेळेत महाविद्यालयामध्ये हि कार्यशाळा होणार आहे. तसेच वनौषधी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेत आयुर्वेदाचार्य वैद्य सुविनय दामले यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन लाभणार आहे. आपल्या मनातील अरोग्यासंबंधी प्रश्नाचे आयुर्वेदीय समाधान होणार आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे. त्यासाठी आगाऊ नाव नोंदणी आवश्यक आहे.अधिक महितीसाठी प्रा. डॉ.आर. वाय. ठाकूर (मो.क्र.९४२१२३८७८५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.