कनेडी बाजारपेठ येथे शिवजयंती उत्सवा निमित्त विविध स्पर्धा

युवा संदेश प्रतिष्ठान चे आयोजन
वेशभूषा, वक्तृत्व, हस्ताक्षर व निबंध स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचीत्याने आज कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय जनता पार्टी नाटळ- सांगवे विभागिय कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पूजा आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय आणि युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्या वतीने वेशभुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली स्पर्धेनंतर लगेचच वेशभूषा , वक्तृत्व, हस्ताक्षर व निबंध स्पर्धा या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन बक्षिस वितरण करण्यात आले यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत, आणि मा सौ संजना संदेश सावंत,माजी जि प अध्यक्षा, सुरेश सावंत, माजी सभापती, सरपंच संजय सावंत, सानिका गावकर,अशोक कांबळे, विठ्ठल रासम, प्रफुल्ल काणेकर, महेश खंदारे , नाना जाधव, केंद्र प्रमूख उत्तम सूर्यवंशी, संदिप तांबे, सुशांत मर्गज आदी मान्यवर उपस्थितीत होते .
दिगंबर वालावलकर /कणकवली