आचरा येथे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

आचरा : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीच्या औचित्यावर मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवारी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या वेळी त्यांच्या सोबत वायंगणी माजी सरपंच संजना रेडकर, महिला युवती पदाधिकारी आर्या गांवकर, भारती परब, मिताली कोरगांवकर, आशा हजारे, सरिता हिर्लेकर, मनाली आर्लेकर,सुवर्णलता पांगे, सुनीता गांवकर, गीता गांवकर विभाग प्रमुख समिर लब्दे,विद्यानंद परब, राजू नार्वेकर, प्रशांत गांवकर
आदी उपस्थित होते.
यावेळेस शिवरायांना घडवणारी आई जिजाऊबाई यांचे विचार कार्यक्रमाला उपस्थित असलेले
विद्यानंद परब यांनी मांडले. तसेच महिला एकत्र येऊन त्यांच्यामधील एकोपा वाढण्यासाठी गेली चार वर्ष आमदार वैभव नाईक आचरे विभागात हळदीकुंकू समारंभ घेण्याच्या संकल्पने बद्दल महिला वर्गातून आमदार नाईक यांना धन्यवाद दिले जात आहेत.

उपस्थित महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर, वायंगणी माजी सरपंच संजना रेडकर, महिला युवती पदाधिकारी आर्या गांवकर, भारती परब, मिताली कोरगांवकर, आशा हजारे, सरिता हिर्लेकर, मनाली आर्लेकर,सुवर्णलता पांगे, सुनीता गांवकर, गीता गांवकर विभाग प्रमुख समिर लब्दे,विद्यानंद परब, राजू नार्वेकर, प्रशांत गांवकर

अर्जुन बापर्डेकर / कोकण नाऊ / आचरा

error: Content is protected !!